Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali : 'Excuse me' बोलताच वाद; मराठीत बोला म्हणत महिलेसह कुटुंबियांना बेदम मारहाण

Dombivali News : राज्यभरात अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याचे पाहायला मिळत होतं. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून देखील वाद निर्माण झाल्याने हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: कार्यालयांमध्ये इंग्रजी नाही तर मराठी भाषेचा वापर व्हावा; यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात आहे. मात्र सर्वसामान्य जीवनात सहज वापरल्या जाणाऱ्या साध्या "एस्क्युज मी" या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे जुनी डोंबिवली परिसरात पहायला मिळाले. एस्क्युज मी' बोलताच महिलेशी वाद घालण्यास सुरवात केली. तर मराठीत बोला असे म्हणत महिलेसह तिच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. 

डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम गुप्ता या काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या काही जणांना बाजूला होण्यासाठी त्यांनी "Excuse me" असे इंग्रजीत म्हणाल्या. त्यांनी एक्सक्युज मी म्हणताच तरुण संतापले आणि त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली.  

कुटुंबाला बेदम मारहाण 

यावेळी रितेश बाबासाहेब ढबाले त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले व त्यांच्या काही साथीदारांनी "इंग्रजी नको, मराठीत बोला" म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या मारून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर या गोंधळात पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पोलिसात तक्रार 

राज्यभरात अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याचे पाहायला मिळत होतं. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून देखील वाद निर्माण झाल्याने हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत तपास सुरू केला आहे. तर या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT