Dombivali Crime News Dombivali Crime News
महाराष्ट्र

Dombivali Crime News : पोलिस भरतीच्या नावाने महिलेला गंडा; महागड्या मोबाईलच्या लालसेने अडकला

Dombivali News : निकम याने स्वतःजवळील पोलीस मित्र मंडळ व आरोग्य खात्याचे ओळखपत्र दाखवत विश्वास संपादन केला

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

कल्याण : भावाला पोलीस खात्यात भरती करण्याचे आमिष एकाने महिलेला दाखवले. त्यानंतर पैसे व महागड्या मोबाईलची मागणी केली. भाऊ (Police) पोलिस खात्यात भरती होईल; या आशेने महिलेने रोख रक्कम व मोबाईल घेऊन दिला. (Dombivali) मात्र नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याबाबत सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Breaking News)

डोंबिवलीत राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा भाऊ नोकरीच्या शोधात होता. महिला देखील त्याला नोकरी शोधण्याचे प्रयत्न करत होती. (Crime News) याच दरम्यान या महिलेचे अरविंद निकम या भामट्याशी ओळख झाली. निकम याने माझी पोलीस आणि आरोग्य खात्यात ओळख असल्याचे सांगत कोणालाही कामाला लावू शकतो; असे अमिष महिलेला दाखवले. निकम याने स्वतःजवळील पोलीस मित्र मंडळ व आरोग्य खात्याचे ओळखपत्र दाखवत विश्वास संपादन केला. नोकरी लावून देण्यासाठी निकम याने महिलाकडे ८० हजार रुपये व एका महागड्या मोबाईलची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भावाला नोकरी मिळेल या आशेने या महिलेने त्याला पैसे व मोबाईल घेऊन दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागली नाही. याबाबत निकम याला विचारले असता त्याने उडवाडवीचे उत्तरे दिली. महिलेला आपली (Fraud) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक विजय कादबााने यांच्याशी संपर्क साधला. विजय कादबाने यांनी पोलिस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले. अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेने मोबाईल देत असल्याचे सांगत घरडा सर्कल येथे बोलावले. मोबाईल घेण्यासाठी आलेला अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या भामट्याने अनेक तरुणांची फसवणूकी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन् माझी हो..' प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, 'नको तिथे स्पर्श' करत लैंगिक अत्याचार

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले, नंतर...

SCROLL FOR NEXT