RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी; प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या

Sambhajinagar News : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो.
RTE Admission
RTE AdmissionSaam Tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई  प्रवेशांतर्गत (RTE) मोफत प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत. (Sambhajinagar) या बदलांमुळे आरटीईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत. आता या प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे. (Breaking Marathi News)

RTE Admission
Suresh Navale News : महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपने वेठीस धरलंय; शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा आरोप

(Education Department) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे (School) प्रमाण अधिक असते. हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जात असतो. २०२४- २५ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरवात होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RTE Admission
Water Scarcity : अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; उदगीर परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले असून राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्यात म्हणजे ५ एप्रिलनंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ५७० पैकी २ हजार ८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ इतकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com