Dombivali Crime  Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : लाथाबुक्क्यांनी मारहाण, चाकूचा धाक दाखवून भर रस्त्यात दोघांना लुटले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivali News : चोरटयांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मारहाण करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या खिशातून देखील दोन हजार रुपये काढून घेतले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: भर रस्त्यावर गाठत लूटमार केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यातच डोंबिवलीतील टिळक रोड या रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दोघांनी चाकूचा धाक दाखवत तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दोन जणांना लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरात राहणारे राहुल चौरासिया हे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोडवरून पायी जात होते. याच वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये दोन जण एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशात असलेली रक्कम चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. सदर इसम मदतीसाठी ओरडत असल्याने राहुल व त्यांचे मित्र राघव या दोघांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

चाकूचा धाक दाखवून दोघांना लुटले 

दरम्यान चोरट्यांच्या तावडीतून सोडण्यासाठी गेलेल्या राहुल यांना देखील चोरटयांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मारहाण करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या खिशातून देखील दोन हजार रुपये काढून घेतले. या दरम्यान काही नागरिकांनी याबाबत तत्काळ डोंबिवली पोलिसांना माहिती दिली. 

दोघांना घेतले ताब्यात 

रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही लुटारूना ताब्यात घेत अटक केली आहे. तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात अशी या आरोपींची नावे असून ही दोघेही डोंबिवलीतील सोनार पाडा परिसरातील रहिवासी आहे. या दोघांविरोधात या आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी या आधी अशा प्रकारे लूट केली असल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT