Sudhakar Adbale : शिक्षक भरती घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात, एसआयटीतर्फे चौकशी करा; शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची मागणी

Wardha News : यामध्ये २०१२ ते २०२२ च्या दरम्यान बॅक डेटच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: नागपूर येथे उघडकीस आलेला शिक्षक भरती घोटाळा हा केवळ नागपूर पुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र प्रती बिहार होतो की काय असं वाटत आहे. यामुले घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी; अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. 

वर्धा येथे आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षक घोटाळ्याबाबत माहिती दिली. नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये २०१२ ते २०२२ च्या दरम्यान बॅक डेटच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे. कराच्‍या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय कारण्याचं काम या माध्यमातून होताना दिसत आहे.

Wardha News
Badlapur : 'देवाभाऊ' चष्मा फक्त ३३ रूपयांना, १४० देशांना बदलापूरकर पुरवणार चष्मा?

दोषींवर दंडात्मक कारवाई करावी 

या संदर्भामध्ये सायबर सेलला तक्रार झाली आणि सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. ११ एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. रोज एक- एक दोघांना अटक केली जात आहे. मात्र विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अशी मागणी आहे, की बोगस नियुक्त झाले असेल तर यावर एसआयटी नियुक्त करून त्या संदर्भात तपासणी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. 

Wardha News
Banana Crop : वाढत्या उष्णतेचा फळबागांना फटका; पाणी पातळी घटल्याने केळी बाग वाळली, पपईवरही परिणाम

माध्यमिक शिक्षणाधिकारीचा पदभार नियमांना डावलून 

तसेच जिल्हा परिषदमध्ये अधिकाऱ्यांची जे पद रिक्त होतात ती पद सिईओने त्या जिल्ह्यातल्या सेवाजेष्ठतेनुसार पदभार देण्याची नियमानुसार तरतूद आहे. पण वर्धा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना मात्र वर्धा शिक्षण माध्यमिक पदाचा प्रभार शिक्षण संचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार उपसंचालक नागपूर यांनी नागपूरच्या डायटचे प्राध्यापक मनीषा भडंग यांना दिला आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने व नियमावलीला डावलून हा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारीला असतांना त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम वर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घडलेला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com