Badlapur : 'देवाभाऊ' चष्मा फक्त ३३ रूपयांना, १४० देशांना बदलापूरकर पुरवणार चष्मा?

Badlapur News : जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते. या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत २९ एप्रिल ते १ मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचे आयोजन
Badlapur News
Badlapur NewsSaam tv
Published On

मयुरेश कडव 

बदलापूर : अंधत्व निवारण मोहिमेत गेली ३४ वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या ३३ रुपयात चष्मा बनवला आहे. इतकेच नाही तर नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत 'देवाभाऊ' नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे. अर्थात निवड झाल्यास १४० देशात हा ३३ रुपयांचा चष्मा पुरविला जाणार आहे. 

IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते. या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत २९ एप्रिल ते १ मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत ७६ देशातील ७०० नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. यात बदलापुरातील व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेचाही समावेश आहे. 

Badlapur News
Datta Bharane : पालकमंत्री असतो तर सोलापूरच्या जनतेने मला डोक्यावर घेतलं असतं; दत्ता भरणे यांचा जयकुमार गोरे यांना टोला

आतापर्यंत १७ लाख चष्म्याचे वाटप 

दरम्यान आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्यातून त्यांनी आतापर्यंत १७०० गावांमधून २६ लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे. तसेच १७ लाख चष्म्यांचही वाटप करण्यात आले आहे. आता साकिब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांपासून प्रेरणा घेत त्यांच्या नावाने नावाने सर्वात स्वस्त, टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्यांची सीरिज बनवली आहे. ३३ रुपयांपासून ते २६० रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांमुळे जगात क्रांती घडेल; असा विश्वास साकिब गोरे यांनी व्यक्त केला. 

Badlapur News
Jalgaon : प्रेमभंगाच्या नैराश्यातून टोकाचा निर्णय; इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवत महाविद्यालय आवारातच घेतला गळफास

तर १४० देशात पोहचणार देवाभाऊ चष्मा 

चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ आली. मात्र त्यांना अवघ्या ३३ रुपयात 'देवाभाऊ' चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल, असा दावा साकिब गोरे यांनी केला. काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या ७०० संस्थांपैकी तीन संस्थाची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आली. त्यापैकीच एक व्हिजन फ्रेंड साकिब गोरे ही संस्था आहे. या तीन संस्थांमधून एका संस्थेची IAPB कडून अंतिम निवड केली जाणार आहे. समिटमध्ये IAPB आणि WHO ने या चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून १४० देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना ३३ रुपयांत म्हणजेच ०.३८ डॉलर्समध्ये हा चष्मा उपलब्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com