Banana Crop : वाढत्या उष्णतेचा फळबागांना फटका; पाणी पातळी घटल्याने केळी बाग वाळली, पपईवरही परिणाम

Nanded News : राज्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जवळपास सर्वच प्रमुख शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे बाहेर जाणे देखील कठीण होत आहे. अशातच जमिनीतील पाण्याची पातळी देखील खालावली
Banana Crop
Banana CropSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: राज्यात तापमानाचा पारा वाढत आहे. या सोबतच पाण्याची पातळी देखील खालावत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम फळबागांवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण पुरेसे पाणी देता येत नसल्याने पिकांना याचा फटका बसत आहे. यात नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात दोन एकर क्षेत्रातील केळीची बाग पाण्याअभावी सुकू लागली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

राज्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जवळपास सर्वच प्रमुख शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे बाहेर जाणे देखील कठीण होत आहे. अशातच जमिनीतील पाण्याची पातळी देखील खालावली आहे. परिणामी तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अशात पिकांना पाणी देण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका फळ बागांना बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Banana Crop
Jalgaon : प्रेमभंगाच्या नैराश्यातून टोकाचा निर्णय; इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवत महाविद्यालय आवारातच घेतला गळफास

दोन एकरातील केळी बाग वाळली  

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील शहापूर येथील शेतकऱ्यांनी दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटल्याने मुंजाजी शिरसागर या शेतकऱ्याची २ एकर वरील केळीची बाग उभी वाळली आहे. या शेतकऱ्याने एकूण आपल्या शेतात १३ बोरवेल घेतले असून एकाही बोरवेलला पाणी नसल्याने शेतकऱ्याचे केळीचे उत्पादन हातचे गेले आहे. लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने सरकारने मदत करावी; अशी मागणी शेतकरी मुंजाजी शिरसागर यांनी केली आहे.

Banana Crop
Badlapur : 'देवाभाऊ' चष्मा फक्त ३३ रूपयांना, १४० देशांना बदलापूरकर पुरवणार चष्मा?

उन्हापासून पपईच्या रोपांचे संरक्षण
नंदुरबार
: देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. या सर्वाधिक क्षेत्र उन्हाळी पपई लागवडीचे असते. मात्र यावर्षी वाढत्या तापमानामुळे उन्हाळी पपई लागवडीला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पपईची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांकडून वाढत्या उष्णतेपासून पपईच्या रोपांच्या संरक्षणासाठी लागवड केलेल्या रोपांना कागदी आणि कापडी अच्छादने लावून उष्णतेपासून संरक्षण केले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com