Breaking News , Nashik , Doctor , Wife , Love, Husband saam tv
महाराष्ट्र

Love : बॉयफ्रेंडच्या प्रेमात आकंठ बुडाली; पत्नीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन दिले अन्...

या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Breaking News : डॉक्टर (doctor) पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न नाशिक (Nashik) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम (love) संबंधातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे.

डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली आहे. डाॅक्टरच्या दुसर्‍या पत्नीनं तिच्या प्रियकराला बराेबर घेऊन हा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबात एकच खबळबळ उडाली.

रजिस्टर मॅरेज केलेल्या दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करुन वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरुळ परिसरात 55 वर्षीय पीडित डॉक्टरचे स्वत:चे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर १० सप्टेंबर रोजी डॉक्टरला भेटले. तिथे डॉक्टरांसोबत दोघांचे वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला तर पत्नी डॉक्टरांसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली.

तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या पत्नीचे नात्यातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे डॉक्टरला कळले. त्यातून हा वाद झाल्याचे कळते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

SCROLL FOR NEXT