Uddhav Thackeray Sanjay Raut
Uddhav Thackeray Sanjay Raut Saam Digital News
महाराष्ट्र

Sanjay Raut News : संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, उद्धव ठाकरेंनी केली मध्यस्थी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut Latest News : खासदार संजय राऊत यांनी कोवीडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले होते. त्यानंतर या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले. राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला.

आयएमएसह प्रमूख संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कल्याण आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. त्यानंतर थेट पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनाच डॉक्टरांची समजूत काढावी लागली.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना 'कोवीडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले.

काय म्हणाले कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील?

संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विधान फार वेदनादायक होतं. पहिल्या लाटेत कल्याण डोंबिवलीतील खाजगी डॉक्टर महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यातले डॉक्टर ठाकरे सरकार बरोबर खांद्याला खांद्या लावून काम करत होते. त्यानंतर हे विधान आल्यानंतर आम्हाला खूप वेदना झाल्या.

याचा रोश आम्ही कल्याणमधील ठाकरे गटाचे स्थानिक नेते विजय साळवी यांच्याकडे मांडला आणि ही बाब उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करत हे गैरसमजतातून झाले. आम्हाला डॉक्टर, नर्सबद्दल नितांत आदर आहे. कोविडवर मात आपण डॉक्टर, नर्सेस आणि इतरांच्या साहाय्याने करू शकलो. त्यानंतर या वादावर आता पडदा पडला असे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT