former mla sujit minchekar, kolhapur, karnataka, maharashtra saam tv
महाराष्ट्र

Karnataka ला एक थेंब पाणी देऊ नका; सातारा, सांगली, काेल्हापूरातील शेतीचा विचार करा : ठाकरे गटाची भूमिका

वारणा किंवा कोयना जलाशयातून तीन टीएमसी पाणी कृष्णा नदीस सोडले जावे, तसेच उजनी धरणातील तीन टीएमसी पाणी भीमा नदीत सोडले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

Kolhapur News : एका बाजूला कोल्हापुरात (kolhapur) पाणी टंचाईचे सावट असताना दुसऱ्या बाजूला कर्नाटकने सहा टीएमसी पाण्याची मागणी महाराष्ट्राकडे केली आहे. कर्नाटकच्या (karnataka) या मागणीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (uddhav thackeray shivsena) विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कोल्हापूर (kolhapur), सांगली (sangli), सातारा (satara) या जिल्ह्यांना सध्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे हे पाणी सोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार सुजित मिणचेकर (former mla sujit minchekar) यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

कर्नाटक राज्याच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग यांनी महाराष्टाच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना पत्र पाठविले आहे. उत्तर व हैदराबाद कर्नाटकातील सहा जिल्‍ह्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कर्नाटकाने महाराष्ट्राकडे या पत्राद्वारे तब्बल सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.

दरम्यान कोल्हापुरात आज मध्यरात्री पासून उपसाबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. आज पाटबंधारे विभागासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

ऐन उन्हाळ्यात उपसाबंदीमुळे पिके होरपळून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही उपसा बंदी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी आमदार संजयबाबा घाटगे यावेळी देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Godi Dal Recipe: अस्सल कोकणी स्टाईल गोडी डाळ कशी बनवायची?

सावकराचा अमानुष चेहरा! कर्जाच्या पैशासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

Kitchen Hacks : बाथरूम मधील टाईल्स पिवळ्या पडून घाण दिसत आहेत? मग लगेच करा हे घरगुती उपाय

Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीला बावधन दोन पोलिसांनी येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT