Road Accident  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Road Accident : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर; वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Maharashtra Road Accident update : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात

दोन्ही अपघातांमध्ये एकूण ७ जणांचा मृत्यू

ऐन सणात घडललेल्या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा

राज्यातील विविध भागात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त अनेकांची लगबग सुरु आहे. या दिवाळीच्या धामधुमीत महाराष्ट्रातील दोन ठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली. दोन्ही ठिकाणी घडलेल्या या अपघातात ७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. ऐन दिवाळीत झालेल्या अपघाताने मृतांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ऐन दिवाळीत विपरीत घडल्याने उत्सवावर शोककळा पसरली आहे.धाराशिवमध्ये दोन महागड्या कारचा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर कोल्हापुरात झालेल्या अपघातात तिघे दगावले. दोन्ही अपघातात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला.

कोल्हापुरात अपघाताचा थरार

कोल्हापूरच्या राधानगरी कौलव मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोल्हापूरच्या कौलव येथे खरेदीसाठी आलेल्या सख्ख्या बहीण-भाऊ आणि पुतणीचा अपघातात मृत्यू झाला. अपघातात मृत झालेले नागरिक राधानगरी तालुक्यातील तरसमळे येथील आहेत. या अपघात श्रीकांत कांबळे (३०), दीपाली कांबळे(२८) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

धाराशिवात झालेल्या अपघात ४ जणांचा मृत्यू

धाराशिवातील उमरगा तालुक्यातील डाळिंबजवळ सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन अलिशान कारचा अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. गाडी चालवताना कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात बिदरमधील चौघांचा मृत्यू झाला.

अपघातात सोलापूर येथील दोघेजण गंभीर जखमी झाले. तर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यातून खासमपूर बिदरकडे जाताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्यावरील कुत्र्याला वाचवताना गाडी दुभाजक ओलांडून चुकीच्या मार्गावर जाताना पलीकडील अलिशान कारला जाऊन धडकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ तो बडा होने वाला है'; अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची ५० मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT