जळगावमध्ये सुतळी बॉम्ब हातात फुटल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
दिवाळीत फटाके फोडताना मुलाच्या हाताची चार बोटे निकामी
फटाका हातात फुटल्याने मुलाचा चेहरा भाजला
दिवाळी म्हणजे खुसखुशीत फराळ आणि त्याच्या जोडीला फटाके, त्यातही मुलांना फटाके फोडण्यात वेगळाच आनंद असतो. मात्र काही वेळा निष्काळजीपणा नडतो आणि दुर्घटना घडते. जळगावात हातात फटाका फुटल्याने दहा वर्षांच्या मुलाची चारही बोटे निकामी झाली. इतकंच नाही तर चेहरा देखील भाजला. त्याचं झालं असं की जळगाव शहरातील पवार कुटुंबिय मोठ्या उत्साहानं फटाके फोडत असताना मात्र कृष्ण पवार यांच्या वीर नावाच्या मुलाच्या हातातच सुतळी बॉम्ब फुटला. रक्तबंबाळ झालेल्या वीरला कुटुंबियाने त्वरीत डॉक्टरांकडे नेले.
डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्याने करंगळी आणि अंगठा वगळता या मुलाची इतर बोटं वाचली असली तरी प्रत्येक वेळेला त्वरीत उपचार मिळून दिलासा मिळेलच असं नाही. आपल्या नातवावर जो प्रसंग आला तसा कुणावर येऊ नये म्हणून पालकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन वीर पवारच्या आजीने केले आहे.
फटाके फोडताना काय काळजी घ्यावी ते पाहूया.
मुलांजवळ पालकांनी उपस्थितीत राहावे
सुतळी बॉम्बसारखे मोठे फटाके मुलांना देऊ नये
सुती कपडे घालावेत
पाण्याची बादली जवळ ठेवावी
जखम झाल्यास डोळ्यांचे डॉक्टर, प्लास्टिक सर्जनकडे त्वरीत जावे
खरं तर ध्वनी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके फोडू नये असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि कलावंतही पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन जनतेला करतात. मात्र फटाके फोडण्याचा मोह आवरला जात नाही. पालकांनी सतर्क राहावे आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे तरच दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.