DIVEAGAR BEACH TRAGEDY: 8 STUDENTS DIE IN RAIGAD SEA ACCIDENT; SAFETY SYSTEM UNDER SCRUTINY saam tv
महाराष्ट्र

सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर, दिवेआगर किनाऱ्यावरील निष्क्रिय यंत्रणेचे 8 बळी

Raigad Diveagar Beach Accident: रायगडमधील प्रसिद्ध अशा दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील मुर्दाड सुरक्षा यंत्रणा चव्हाट्यावर आलीये. 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याचं समोर आलंय. त्यावर स्थानिक आमदारांनीही पोलिसांना चांगलंच सुनावलं. विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कसा झालाय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

पुण्याच्या आळंदीतल्या विनर्स अकॅडमी या खाजगी क्लासेसनं रायगडमधील दिवेआगर सुमद्रकिनारी नेलेल्या सहलीत 8 विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं आठही जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी थेट अॅकेडमीकडे धाव घेतली. मात्र, अॅकेडमीचं ऑफिस बंद असल्यानं अखेर पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आक्रोश केला. इतकंच नव्हे तर सुमीत अहिरेचं पार्थिव घरी आणताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. एकुलत्या एक मुलाला गमावल्यानं न भरून येणारी हानी झाल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय...

एव्हंढच नव्हे तर ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचं कारण सहलीला गेलेल्या एका विद्यार्थिनीनं सांगितलंय. तर दुसरीकडे, या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणांचा निष्क्रिय कारभारावर स्थानिक आमदार आणि मंत्री आदिती तटकरेंनी थेट आयोजक आणि पोलिसांना जाब विचारला..या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय. दिवेआगरसारख्या सुमारे 4 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यासंदर्भात सामनं काही सवाल उपस्थित केलेत...

किनाऱ्यावर पुरेसे जीवरक्षक उपस्थित का नव्हते?

पुरेसे लाईफ जॅकेट, दोरखंड, रेस्क्यू बोट, अन्य उपाययोजना होत्या का?

किनाऱ्यावरील धोक्याची माहिती देण्यात आली होती का?

पावसाळा संपल्यानंतरही बंद असलेले वॉटर स्पोर्टस का सुरू केले नाहीत?

विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी क्लासेसचे पुरेसे शिक्षक होते का?

सहलीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का?

अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांमुळे दिवेआगर समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सहलीसाठी केवळ संमतीपत्र घेणं पुरेसं नाहीये. तर क्लासेसनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेणेही महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे खासगी क्लासेस की मुर्दाड यंत्रणा?... हे तपासातून समोर येईल. मात्र, निष्काळजीपणामुळे आज ८ निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेलाय. आणि यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महाआघाडीत फूट; काँग्रेसला मित्रपक्षानेच दिलं आव्हान

सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार? बँकांचे सरकारी नोटिफिकेशन व्हायरल

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदेचे वाहन गुन्हे शाखेकडून जप्त

बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी; सुटकेच्या आधी पोलिसांनी त्याला काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT