Son Papdi Recipes : दिवाळीत भरपूर सोनपापडी मिळालीये? फेकून देण्याऐवजी बनवा 'या' ५ भन्नाट रेसिपी!

Leftover Son Papdi Sweets Ideas : दिवाळीत गिफ्ट म्हणून मिळालेली सोनपापडी खाऊन कंटाळा आला असेल, तर तिच्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवता येतात. उरलेल्या मिठाईचा योग्य वापर करून खाद्यपदार्थांची नासाडी टाळता येते.
Leftover Son Papdi Sweets Ideas
Son Papdi RecipesAI PHOTO
Published On: 
Summary

दिवाळीला मोठ्या प्रमाणात सोनपापडी वाटली जाते

मिठाई वाया न घालवता उरलेल्या पदार्थांचा करा स्वादिष्ट वापर

सोनपापडीचा वापर करून टेस्टी पदार्थ बनवा

दिवाळीत गिफ्ट म्हणून सोनपापडीचे अनेक बॉक्स मिळतात. सुरुवातीला आवडीने खाल्ली जाणारी सोनपापडी काही दिवसांनी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी ती फेकून देण्याऐवजी तिच्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार करू शकता. विशेष म्हणजे या रेसिपी बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया उरलेल्या सोनपापडीपासून बनवता येणाऱ्या ५ झटपट रेसिपी!

सोनपापडी लाडू

सोनपापडी लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम सोनपापडी हाताने बारीक कुस्करून घ्या. त्यात किसलेले खोबरे आणि बदाम मिसळा. मिश्रणात तूप घालून एकजीव करा. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे दूध घाला आणि लगेच लाडू वळा. तयार लाडूवर बदामाचे काप लावून सजवा.

सोनपापडी मिल्कशेक

सोनपापडी मिल्कशेक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थंड दूध आणि सोनपापडी घाला. त्यात बर्फाचे तुकडे आणि थोडी वेलची पूड टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करा. ग्लासमध्ये काढून वरून बदाम-पिस्ता घालून सर्व्ह करा. सोनपापडी गोड असल्यामुळे अतिरिक्त साखर घालण्याची गरज नाही.

सोनपापडी चॉकलेट बॉल्स

सोनपापडी चॉकलेट बॉल्स बनवण्यासाठी एका भांड्यात कुस्करलेली सोनपापडी घ्या. त्यात वितळवलेले चॉकलेट आणि कोको पावडर मिसळा. त्यात काजू-बदाम घालून मिश्रण एकत्र करा. या मिश्रणाचे छोटे गोल बॉल्स तयार करा. फ्रिजमध्ये १५ ते २० मिनिटे ठेवून थंड सर्व्ह करा.

सोनपापडी ब्रेड पुडिंग

सोनपापडी ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी ब्रेडचे छोटे तुकडे करून घ्या. एका भांड्यात दूध, सोनपापडी आणि वेलची पूड एकत्र करा. त्यात ब्रेडचे तुकडे घालून काही मिनिटे मुरू द्या. एका ग्रीस केलेल्या भांड्यात हे मिश्रण काढा. वरून बदाम-पिस्ता घालून झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घ्या. मिश्रण सेट होईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर पुडिंग सर्व्ह करा.

सोनपापडी रबडी डेझर्ट

सोनपापडी रबडी बनवण्यासाठी एका पातेल्यात दूध गरम करा. त्यात मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिसळा. दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात कुस्करलेली सोनपापडी घाला. वेलची पूड आणि केशर टाकून मंद आचेवर काही मिनिटे शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. वरून बदाम-पिस्ता घालून थंडगार रबडी डेझर्ट सर्व्ह करा.

Leftover Son Papdi Sweets Ideas
Gulkand Water : सकाळी रिकाम्या पोटी प्या गुलकंदाचं पाणी, फक्त १० दिवसांत दिसतील ५ मोठे बदल

सोनपापडी वापरताना 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा

  • सोनपापडी ताजी आणि खाण्यास सुरक्षित असल्याची खात्री करा.

  • बुरशी आलेली, वास बदललेली किंवा खराब झालेली सोनपापडी वापरू नका.

  • आधीच गोड असल्यामुळे रेसिपीमध्ये अतिरिक्त साखर घालू नका.

  • दूध किंवा क्रीम वापरून बनवलेले पदार्थ लगेच खा किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.