Almonds vs peanuts: शेंगदाणे की बदाम? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर?

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम अधिक फायदेशीर

बदाम आणि शेंगदाणे या दोन्हीमध्ये शरीरासाठी चांगले असणारे फॅट्स असतात. शेंगदाण्यांच्या तुलनेत बदामामध्ये चांगले म्हणजेच अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त आणि खराब म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Almonds for cholesterol | saam tv

फॅट्सचं प्रमाण

एक औंस म्हणजेच सुमारे २८ ग्रॅम बदामामध्ये १३.०७ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि १.१६ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स असतात. याउलट तेवढ्याच शेंगदाण्यांमध्ये १०.२ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि २.१९ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे फॅट्सच्या बाबतीत बदाम खाणे अधिक चांगला पर्याय ठरतो.

Lower LDL cholesterol | saam tv

चांगले फॅट्स

शरीरात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त झाल्यास खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढू शकतं. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. आहारातील सॅच्युरेटेड फॅट्सच्या जागी अनसॅच्युरेटेड फॅट्स घेतल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Good cholesterol | saam tv

बदामामध्ये फायबरचं प्रमाण

बदामामध्ये शेंगदाण्यांपेक्षा थोडे जास्त फायबर असते. २८ ग्रॅम बदामामध्ये ३.१ ग्रॅम फायबर असतं. तर तेवढ्याच शेंगदाण्यांमध्ये २.४ ग्रॅम फायबर मिळते. फायबरमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते.

Heart health | saam tv

बदामामध्ये फायटोस्टेरॉलचं प्रमाण

बदामामध्ये फायटोस्टेरॉल नावाचा वनस्पतीजन्य घटक असतात. हे घटक शरीरात अन्नातून मिळणाऱ्या कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित आहारात बदामाचा समावेश केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Fiber rich foods | saam tv

शेंगदाणे

बदामाच्या तुलनेत शेंगदाण्यांमध्ये चांगले फॅट्स, फायबर आणि फायटोस्टेरॉलचे प्रमाण कमी असले तरी तेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शेंगदाण्यांमध्ये ओलिक अॅसिड नावाचं अनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Healthy fats | saam tv

दोन्हींचा आहारात समावेश करा

नियमित शेंगदाणे खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढण्यास आणि रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होऊ शकते. बदाम खाण्यामुळेही खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदाम आणि शेंगदाणे दोन्ही आहारात योग्य प्रमाणात खावेत.

Heart healthy diet | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा