जागेच्या वादातून पुतण्याला मारहाण; पुतण्याने घेतलं पेटवून, Video Viral
जागेच्या वादातून पुतण्याला मारहाण; पुतण्याने घेतलं पेटवून, Video Viral Saam TV
महाराष्ट्र

जागेच्या वादातून पुतण्याला मारहाण; पुतण्याने घेतलं पेटवून, Video Viral

लक्ष्मण सोळुंके

जालना : जागेच्या वादातून मारहाण केल्याने एका तरुणाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. जालन्यातील परतुर मधील वाई येथे ही घटना घडली आहे. दीपक घाडगे असं जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा स्वतःला जाळून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी परतूर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मयताच्या चुलत्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

परतूर तालुक्यातील वाई गावात अंगणवाडी शेड असलेल्या जागेच्या हिस्स्यावरून 35 वर्षीय दीपक घाडगे आणि त्याचा चुलता मुक्तीराम घाडगे यांच्या वाद सुरू होता. या वादातून काल दुपारी ४.०० वाजता दीपकला त्याचा चुलता मुक्तिराम आणि जणांनी काठ्या-लाठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या सर्व लोकांसमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकनं स्वतःला पेटवून घेतले होते. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला विझवण्याचे प्रयत्न केला नाही.

यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दीपक यास सुरुवातीला जालना आणि नंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले होते. दरम्यान आज उपचार सुरु असतांना दीपक याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयत दीपक याची पत्नी सपना घाडगे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांनी आरोपी मुक्तिराम घाडगे, अभिजित घाडगे, मीना घाडगे, अर्जुन येवले, परमेश्वर येवले आणि भीमा येवले या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT