Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने
बारामती येथे शरद पवार आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यावर बारामतीच्या भिगवन चौकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. बारामतीच्या भिगवण चौकात शरद पवार गटाची बाईक रॅली होती. नेमकं याच ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यावर दोन्ही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमकही झाल्याचं पहायला मिळाली. पण, वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोन्ही गटांनी माघार घेतली. बारामती लोकसभा मतदासंघात पावर विरुद्ध पवार सामना रंगलाय. त्याचेच पडसाद आता कार्यकर्त्यांमध्येही पहायला मिळातायेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.