नाशिकसह बीडमध्ये लालपरी वर हल्ला; 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या

बीडमध्ये आज 23 दिवसानंतर, पहिल्यांदाच लालपरी रस्त्यावर धावली होती.
नाशिकसह बीडमध्ये लालपरी वर हल्ला; 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या
नाशिकसह बीडमध्ये लालपरी वर हल्ला; 4 बसेस अज्ञातांनी फोडल्याSaam TV

नाशिक जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. उमराणेजवळ 3 एसटीच्या बसेस फोडल्या आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ 3 एसटी बसेस फोडल्या आहेत. 3 पैकी एक बस धुळ्याहून येत होती, 2 बस मालेगावकडे जात होत्या. एका बसच्या ड्रायव्हरला हाताला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर, बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत. राज्यातील आजपासून काही भागात कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. अनेक जिल्ह्यात एसटी सुरु झाल्या आहेत. परंतु काही जिल्ह्यात कर्मचारी संपावर कायम आहेत.

नाशिकसह बीडमध्ये लालपरी वर हल्ला; 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या
एसटी संप सुरु तरीही शहापूर आगारातून धावली पहिली लालपरी

तिकडे बीडमध्ये आज 23 दिवसानंतर, पहिल्यांदाच लालपरी रस्त्यावर धावली होती. यावेळी बीड बसस्थानकातून गेवराई आणि अंबाजोगाईसाठी बस सोडण्यात आली होती. यादरम्यान MH20 AD BL 1805 ही बस अंबाजोगाई वरून परत येत असतांना, मांजरसुंबा परिसरामध्ये, अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या समोरील काच फुटली आहे. तरी यामध्ये कोणत्याही प्रवाशाला हानी झाली नसून ही बस कोणी फोडली? हे अद्याप समजू शकलेले नाही. तर या संदर्भात लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती, विभागीय नियंत्रक अजय मोरे यांनी फोनवरून दिली आहे.

दरम्यान राज्यात गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सराकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु अजूनही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावरती ठाम आहेत. सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थानीक पातळीवर होते, त्यानंतर त्याला बळकटी मिळत गेली आणि एसटी कामगारांचा मोर्चा धडकला तो थेट आझाद मैदानावर. आझाद मैदानावर अनेक दिवस कर्मचारी बसून होते. सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या त्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे, तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com