एसटी संप सुरु तरीही शहापूर आगारातून धावली पहिली लालपरी

20 दिवस संप सुरू आहे. दिवसभरात 3 फेऱ्या मारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एसटी संप सुरु तरीही शहापूर आगारातून धावली पहिली लालपरी
एसटी संप सुरु तरीही शहापूर आगारातून धावली पहिली लालपरीSaam Tv

फय्याज शेख

शहापूर : राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून आज शहापूर बस आगरातून पहिली बस शहापूर - किन्हवली साठी धावली आहे. शहापूर बस स्थानकातून पहिली बस किन्हवली च्या दिशेने प्रवाशी घेऊन निघाली व एक फेरी देखील पुर्ण केली. आज सकाळी 7 वाजता शहापूर आगरातून पहीली बस घेऊन वाहक - शंकर शेरे व चालक - अशोक डोंगरे यांनी पहीली बस सेवा सुरु केली असून शहापूर ते किन्हवली पहिली फेरी पूर्ण करण्यात आली आहे. शहापूर बस वाहतूक नियंत्रण महेश परटोले ,डेपो मेनेजर, मेकेनिकल, कॅशियर जवळपास 15 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 20 दिवस संप सुरू आहे. दिवसभरात 3 फेऱ्या मारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान राज्यात गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सराकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु अजूनही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावरती ठाम आहेत. सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थानीक पातळीवर होते, त्यानंतर त्याला बळकटी मिळत गेली आणि एसटी कामगारांचा मोर्चा धडकला तो थेट आझाद मैदानावर. आझाद मैदानावर अनेक दिवस कर्मचारी बसून होते. सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या त्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे, तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com