Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभेपूर्वी मविआत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता जागावाटपावरून ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला आहे. तर लोकसभेच्या यशावरून आपणच महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्याचा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्याचं सांगत राऊतांनी काँग्रेसला आरसा दाखवलाय. तर राऊतांनी बातम्या देण्यासाठी असं वक्तव्य केल्याचा पलटवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्तीच्या जागांवर आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर मुख्यमंत्रिपदावरही काँग्रेसने दावा सांगितल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. तर महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. हा प्रस्ताव काय आहे, जाणून घेऊ....

ठाकरेंचा मविआत नवा फॉर्म्युला?

नाना पटोले

काँग्रेस - जागा 105

उद्धव ठाकरे

ठाकरे गट- 95 जागा

शरद पवार

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 88 जागा

लोकसभेत एकदिलाने लढल्याने महाविकास आघाडीने महायुतीचा मोठा पराभव केला. मात्र आता विधानसभेपुर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद आणि जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद न मिटल्यास विधानसभेला महाविकास आघाडीसाठी सत्तेची वाट अवघड बनण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT