nashik municipal corporation  saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात वादाचा नवा अंक, प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं

नाशकात या दोन्ही गटांमधील वाद दिवसागणिक चिघळत असून मनपातील म्युनिसिपल सेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. दोन्ही गटात ऐन दिवाळीत जोरदार फटाके वाजण्यास सुरुवात झालीय. नाशिक महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तीदमे शिंदे गटात गेल्यानंतर कामगार सेना नेमकी कुणाची? यावरून वादाला सुरुवात झाली.

तिदमे शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कामगार सेनेची बैठक बोलवत स्वतःला कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असतांनाच बडगुजर यांनी महापालिकेतील कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला. (Latest Marathi NEws)

मात्र यावर तिदमे यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह १५० जणांविरोधात परस्पर संगनमताने कार्यालयाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेणे, महत्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची फिर्याद देण्यात आली आहे.

त्यामुळे नाशकात या दोन्ही गटांमधील वाद दिवसागणिक चिघळत असून मनपातील म्युनिसिपल सेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे. दोन्ही गटांनी कामगार सेना आणि कामगार सेनेच्या कार्यालयावर आपआपला दावा सांगितला असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT