Sharad Pawar News: मी काय म्हातारा झालो का? कार्यकर्त्याच्या विनंतीवर शरद पवारांनी घेतली फिरकी, सभेत एकच हशा

शरद पवार आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका दौऱ्यावर होते.
Sharad Pawar News in Marathi
Sharad Pawar News in Marathi Saam TV
Published On

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वयाच्या ऐशिंतही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने काम करतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीचं विरोधकही अनेकदा कौतुक करताना दिसतात. शरद पवारांचा दिनक्रम सकाळीच सुरु होतो. या वयातही ते राज्यभर दौरे करत असतात. मात्र कार्यकर्त्यांना त्यांची काळजी आहे. एका कार्यकर्त्यांने शरद पवारांना काळजीपोटी एकाजागी बसून काम करण्याची विनंती केली. त्यावर शरद पवारांनी मिश्किलपणे त्याला मी काय म्हातारा झालो असं म्हटलं. (Latest Marathi NEws)

Sharad Pawar News in Marathi
Political News: आमची सर्वांची मनं जुळलेली... मनसे-भाजप-शिंदे गट महायुतीबाबत मनसे आमदाराचं मोठं वक्तव्य

शरद पवार आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या. गावोगावी फिरू नका ,अशी विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलंअसं म्हणतात सभेत एकच हशा उसळला. (Tajya Batmya)

Sharad Pawar News in Marathi
Balasaheb Thorat: सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस, शेतकऱ्यांना मदत नाही; बाळासाहेब थोरात यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूविकास बँकेचे शेतकरी कर्ज माफीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारची आश्वासनं पोकळ असतात, त्यामुळे जरा सांभाळूनच घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. लबाडाच्या घरचं आवतन आहे. जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, असं पवारांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com