Disha Salian Saam
महाराष्ट्र

Disha Salian: १३ मजल्यावरून पडली तरी चेहऱ्यावर एकही जखम नाही, दिशा सालियानच्या अंत्यसंस्काराचे फोटो व्हायरल

Disha Salian funeral photos controversy: ५ वर्षानंतर दिशा सालियानचे अंत्यविधीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंवरून आता नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ८ जून २०२० ला तिचा इमारतीवरून पडून जागीच मृत्यू झाला होता. २०२१ साली मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूची चौकशी बंद केली होती. ५ वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. असं याचिकेत म्हटलं आहे. आता दिशाचे अंत्यविधीचे फोटो समोर आले आहेत. फोटोवरून नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

५ वर्षानंतर दिशाचे अंत्यविधीचे फोटो समोर आले आहेत. दिशाने आत्महत्या केली की हत्या झाली, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दिशाचे अंत्यविधीचे दोन फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. तिच्या शरीरावर कफन आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेली नाही. हे स्पष्टपणे दिसत आहे.

यानंतर दिशाच्या कुटुंबाने सवाल उपस्थित करत आरोप केले आहेत. १४ व्या मजल्यावरन पडून दिशाचा मृ्त्यू झाला कसा? इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असेल तर, चेहऱ्याला साधं खरचटल्याचे निशानही नाही. हेच सवाल आणि फोटोच्या आधारे दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापलं आहे.

सालियानच्या वकिलांचा खुलासा

रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. दिशाच्या मृत्यूनंतर ५ दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृ्त्यू झाला होता. याच कालावधीत रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंसोबत ४४ वेळा फोन कॉल झाले होते. असा खुलासा सालियान यांचे वकिल निलेश ओझा यांनी केला आहे. दिशा सालियान प्रकरणात डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांचाही सहभाग असल्याचंही वकिलांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT