रोहित पवारांची छात्रासोबत चर्चा साम टीव्ही
महाराष्ट्र

रोहित पवारांनी जाणून घेतला एनसीसी छात्रांचा प्रवास

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : रोहित पवार केवळ आमदार नाहीत. निवडणूक येण्यापूर्वीपासून जनतेशी खासकरून तरूणांशी त्यांचे नाते भावाचे आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात दादा म्हणूनच संबोधले जाते. ज्येष्ठ मंडळी तसेच तरूण मंडळी त्यांच्या एकदम जवळचे आहेत. तेही आपण आमदार असल्याचे कधीच मानत नाहीत. लहान मुले दिसो नाही तर तरूण मंडळी त्यांची गाडी थांबतेच. कालचेच उदाहण बघा ना...

‘काय चाललंय? आई-वडील कसे आहेत? एनसीसी प्रशिक्षण व्यवस्थित सुरू आहे का? सैनिकी शिक्षणाकडे जाण्याची आवड कशी निर्माण झाली? पुढे काय होऊन देशाची, मातृभूमीची सेवा करायची आहे,’ असे प्रश्‍न करीत, ‘कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास निःसंकोचपणे संपर्क करा; मी मदतीसाठी सदैव तयार आहे,’ असा आधार आमदार रोहित पवार यांनी एनसीसी छात्रांना दिला. Discussion of Rohit Pawar with students

तालुक्यातील माहिजळगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आमदार पवार आले होते. कार्यक्रम संपल्यावर परतत असताना, एका रांगेत उभे असलेल्या दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी छात्रांनी त्यांना जय हिंद करीत सॅल्यूट ठोकला.

यावेळी आमदार पवार यांनी छात्रसैनिक विजय नवसरे, हरिश्चंद्र नवसरे, कृष्णा देवरे, प्रेमराज गायकवाड व अमर तेलकर यांची चौकशी केली. या सर्वांनी, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे व एनसीसी विभागप्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगले शिक्षण व सैनिकी प्रशिक्षण मिळत असल्याचे सांगितले. Discussion of Rohit Pawar with students
आमदार पवार म्हणाले, ‘‘आई-वडिलांनी उपसलेले कष्ट आणि परिश्रमाची जाणीव ठेवीत, आपल्या ध्येयाकडे निर्धारक व आश्वासक पावलांनी जा. ते साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कोणी कसेही मूल्यमापन करू द्या; मात्र ज्ञानाची, गुणवत्तेची श्रीमंती श्रेष्ठ आहे.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT