Solapur Water Supply, Water saam tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापुर महापालिका प्रशासन आमच्या जिवाशी खेळत आहे, काळ्यापाण्याच्या शिक्षेपासून वाचवा; महिलांची आर्त हाक

यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Muncipal Corporation News : सोलापुरात (solapur) नागरिकांना पिण्यासाठी दुर्गंधयुक्त काळे पाण्याचा पूरवठा हाेत असल्याचा दावा नागरिक करु लागले आहेत. जलवाहिनीतून गटाराचे पाणी येत असल्याने सोलापूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात अशी मागणी महिलांनी केली आहे. (Maharashtra News)

सोलापूर शहराला चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. चार दिवसांतून एकदा होणाऱ्या पाण्याची योग्य वेळ सोलापूर महानगरपालिकेला पाळता आली नाही. सोलापूर शहरातील अनेक भागात गटारयुक्त पाण्याने नागरिक त्रासले आहेत.

सोलापुरातील भवानी पेठ परिसरात (solapur bhavani peth) दुर्गंधीयुक्त काळे पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही सोलापूर शहराला चार दिवसात पाणी दिले जाते. भवानी पेठ परिसरात नागरिकांना गटारीतील अशुद्ध पाणीचा पुरवठा केला जात आहे. यातून महिलांनी संताप व्यक्त केला आहे. भवानी पेठ परिसरातील नागरिकांच्या पिण्यासाठी पाणी सोडले असता काळी पाणी येते.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका (solapur muncipal corporation) नागरिकांच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहे. चार दिवसात पाणीपुरवठा होऊ नाही काळ्यापाण्याची शिक्षा दिल्यागत प्रशासन वागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT