- सचिन बनसाेडे
Radhakrishna Vikhe Patil News : तुमच्या कुकरची शिट्टी केंव्हाच उडाली असून आमची झाकणं उडायची वाट बघू नका, तर तुमची झाकणं सांभाळून ठेवा असा पलटवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil latest news) यांनी काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्या टीकेवर केला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी वाढत जाणार असेच चित्र निर्माण झालेले आहे. (Maharashtra News)
विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात बाळासाहेब थोरात (balasaheb thorat marathi news) यांनी नुकतीच महाविकास आघाडीची (rahata krushi utpanna bazar samiti election) बैठक घेतली. शिर्डी मतदारसंघात असलेले दहशतीचे झाकण उडवावे लागेल, इथे जिरवाजिरविचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतो अशी टीका थोरातांनी विखे पाटलांवर केली होती.
थाेरातांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिर्डी मतदारसंघात जिरवाजिरविचा कार्यक्रम मोठा आहे, मात्र तुम्ही घाबरायचे सोडून द्या. शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अशी टीका दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली होती.
विखे पाटील यांनी थोरातांच्या टीकेला त्यांच्याच मतदारसंघात जावून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लोकांचा वाळू धंदा बंद केला ही तुम्हाला दहशत वाटते ? सरकारचा पैसा जर कोणी लुटत असेल, मी त्याच्यावर कारवाई करत असेल आणि ती तुम्हाला दहशत वाटत असेल तर त्याची मला चिंता नाही अशी ठाम भमिका विखेंनी मांडली.
सत्ता गेल्यामुळे ही पोपटपंची सुरू आहे. सत्ता गेल्याच त्यांना दुःख वाटतंय. तुमच्या कुकरच्या शिट्ट्या केव्हाच उडाल्यात, आमची झाकण उडायची वाट पाहू नका तुमची झाकण सांभाळा असा टोला विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे.
पदवीधर निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. सोयीनुसार तुम्ही तालुक्याचे राजकारण करता. ज्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही काम करतात त्यांच्याशी तरी प्रामाणिक आहात का ? असा सवाल विखे पाटील यांनी थोरातांना केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.