sangli news saam tv
महाराष्ट्र

Sangli News : कोयनेच्या पाण्यासाठी डिग्रज ग्रामस्थ उतरले नदीपात्रात, टायर पेटवून आंदाेलनास प्रारंभ

राज्य शासनाने मागणी मान्य न केल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

विजय पाटील

Sangli News : कोयना पाणलोट क्षेत्रातुन कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी मौजे डिग्रज येथे आज (शुक्रवार) ग्रामस्थ नदी पात्रात उतरले. ग्रामस्थांनी राज्य शासनाच्या विरोधात घाेषणा देत नदी पात्रात टायर जाळून आंदोलनास प्रारंभ केला. (Maharashtra News)

यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनिल फराटे यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कृष्णेच्या पाठरामध्ये पाणी नसल्याने शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोयनेतून पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. यामुळे कृष्णा नदी भरेल आणि शेतीला मुबलक पाणी मिळेल. शासनाने आमची मागणी मान्य न केल्यास आगामी निवडणुकीत आमच्या राेषास सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT