Ravikant Tupkar News : शेतक-यांनाे! नेत्यांच्या गाड्या आडवा, जाब विचारा : रविकांत तुपकर

हे बिगर राजकीय आंदोलन असून शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन असल्याचे रवीकांत तुपकर यांनी नमूद केले.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSaam tv
Published On

- संजय राठोड

Ravikant Tupkar News : विदर्भातील नगदी पीक असलेले सोयाबीन आणि कापूस या पिकांना उत्पादन खर्च पेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संपूर्ण विदर्भचा दौरा सुरु केला आहे. या दाै-यात आपल्या न्याय हक्कासाठी शेतक-यांनी एकजूटीने लढण्याची तयारी ठेवावी असे आवाहन तुपकरांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra News)

Ravikant Tupkar
Grampanchayat Election News : नाद खूळा! 35 वर्षानंतर खासदार धनंजय महाडिक कुटुंबात सरपंचपदाची माळ

येत्या 20 नोव्हेंबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेतकरी पुत्रांना यावेळी गावात येणाऱ्या नेत्यांच्या गाड्या अडवून सोयाबीन आणि कपाशीला भाव देण्याची मागणी लावून धरावी असे आवाहन तुपकरांनी केले आहे. तसेच हे बिगर राजकीय आंदोलन असून शेतकऱ्यांसाठी आंदोलन असल्याचे म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुपकर म्हणाले मध्यप्रदेश येथे अफू लावण्यास परवानगी आहे व इतर राज्यातील ही अफूसाठी काही प्लॉट देण्यात येतात. अफू औषधासाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशीला भावी देत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. किमान अफू लावायची तरी परवानगी द्या अशी मागणी तुपकरांनी सरकारकडे केली आहे.

तुपकर म्हणाले पिक विमा कंपनी विमा काढताना हजारो कोटी जमा करतात आणि देताना शेकडो रुपये देतात. सरकारचा या विमा कंपन्यांना आशीर्वाद आहे. मागील दहा वर्षाचा या विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट केलं तर राफेल पेक्षाही मोठा घोटाळा या विमा कंपनीतून बाहेर येऊ शकतो मात्र राज्यातल्या आणि केंद्रातल्या मंत्र्यांचा विमा कंपन्यांची मिली भागात असल्याचा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Ravikant Tupkar
Kojagiri Purnima 2023 : आजपासून चार दिवस सोलापूर- तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com