digambar jain panth morcha in washim Saam Digital
महाराष्ट्र

Washim News : वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला दिगंबर जैन समाजाचा माेर्चा

digambar jain panth morcha in washim: न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता श्वेतांबर समाज मंदिरातील इतर दिगंबर वेदीवर व क्षेत्रपाळ, पद्मावती देवी आदि वेदिंवर दहशतीच्या व दिगंबर पंथावर सातत्याने अन्याय हाेत असल्याचे माेर्चेक-यांचे म्हणणे आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

दिगंबर पंथावर होत असलेल्या अन्याया विरोधात आज (शुक्रवार) सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने वाशिम येथील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील समाजबांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या माेर्चेकरांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार शिरपूर जैन येथील अंतरीक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात वारंवार गुजराती श्वेतांबरी जैन समाजाकडून गुंडांच्या माध्यमातून स्थानिक मुळनिवासी महाराष्ट्रीयन मराठी दिगंबर जैन पंथाच्या समाजावर अन्याय केला जाताे. तसेच दर्शना करीता जात असलेल्या भक्तांवर गुंडागर्दी, अरेरावी, मारामारी शिवीगाळ केली जाते. या विराेधात आजचा माेर्चा असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात पुजारी महेश जैन यांना तडीपार करावे. दिगंबरी समाजाकडुन गेलेल्या तक्रारीचा एफआयआर दाखल केल्या जात नाहीत त्या एनसी दाखल केल्या जातात. त्यालाही उशीर केल्या जाताे. जे वादाच्या ठिकाणी उपस्थित नसतात त्यांचावरही एलसीबीच्या माध्यामातुन कार्यवाही करण्याचे काम केले जाते.

दिगंबरी समाजातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देवून खोटया जातीवाचक आणि विनयभंगाचा धाक दडपण दाखवित एफआयआर न देण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो असे नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray Setback : राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र

Bollywood Stars : उंचीवर नाही, तर अभिनयावर जिंकले; कमी उंचीचे हे स्टार्स आहेत सुपरहिट

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Instagram : इन्स्टाग्रामचा Last Seen कसा हाईड करायचा? जाणून घ्या

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असेल तर...; नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT