Shirpur News
Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: सावकारी कर्जाचा हवाला; जाचाला कंटाळून विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने (Student) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वजीत विनोद राठोड (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने (Shirpur) सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरुन तापी नदीत उडी टाकली होती. (Breaking Marathi News)

मांडळ (ता. शिरपूर) शिवारातील साईबाबा अपार्टमेंटसमोर विश्वजीतचे घर आहे. त्याचे वडील विनोद राठोड कन्नड (जि. औरंगाबाद) तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. शहरातील एका महाविद्यालयात विश्वजीत अकरावीच्या वर्गात शिकत होता. २६ जानेवारीला दुपारी दोन जण त्याच्या घरी गेले. त्यांनी पैशांवरुन विश्वजीतशी वाद घातला. त्यानंतर संतापाच्या घरात तो मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला.

पुलाजवळ दिसली मोटारसायकल

विश्‍वजित उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या आईने विनोद राठोड यांना फोन करुन माहिती दिली. विनोद राठोड यांनी त्यांच्या मित्रांना शोध घेण्यास सांगितले. शोध घेत असतांना सायंकाळी साडेसहाला तापी नदीवरील पुलावर त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरु झाला. आज (२७ जानेवारी) त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.

कर्जाचा घेतला होता हवाला

विश्वजीतच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध सावकारांकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा विश्वजीतने हवाला घेतला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करु शकल्यामुळे सावकारांनी विश्वजीत मागे तगादा लावला होता. कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून विश्वजीतने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

SCROLL FOR NEXT