Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : तीन एकरावरील गांजाची शेती उध्वस्त; शिरपूर तालुक्यात पोलिसांची कारवाई

Dhule News : शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती.

भूषण अहिरे

धुळे : शेतात पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या (Dhule) आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साधारण दोन ते तीन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या गांजाची शेती उध्वस्त केली आहे. (Maharashtra News)

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Police) पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीपर्यंत गांजाची (cannabis) लागवड केली असल्याचे पोलिसांना (dhule Police) आढळून आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका गांजा देखील बांधावरती पोलिसांना आढळून आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोट्यवधींचा माळ जप्त 
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजाची ओली झाडे तसेच बांधावर सुकायला ठेवलेली झाडे असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच गांजा लागवड करणाऱ्या संबंधितांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT