Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच मागितल्याचा संशय; वाहनचालक, पंटरविरुद्ध गुन्हा दाखल

Dhule News : लाच दिल्यास प्रांताधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांच्या प्रभावाचा वापर करून पडताळणी व वाहन सोडण्याचा आदेश आणून देतो, असे त्यांनी आश्वासन दिले होते

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : महसूल प्रशासनाने कारवाई करून ट्रॅक्टर आणि ट्रॉली ताब्यात घेतले होते. हे सोडविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या संशयावरून प्रांताधिकारी कार्यालयातील वाहन चालक मुकेश विसपुते व खासगी पंटर बॉबी सनेर अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक (Nashik) येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. (Live Marathi News)

तक्रारदाराचा वीट आणि वाळू पुरवठ्याचा व्यवसाय आहे. त्यांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली महसूल विभागाच्या कारवाईत (Shirpur) जप्त करण्यात आले होते. ते सोडविण्यासाठी संशयित तथा प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय वाहनचालक विसपुते आणि खासगी पंटर सनेर यांनी तक्रारदाराकडे २६ डिसेंबरला २० हजार रुपयांच्या (Dhule) लाचेची मागणी केली होती. लाच दिल्यास प्रांताधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांच्या प्रभावाचा वापर करून पडताळणी व वाहन सोडण्याचा आदेश आणून देतो, असे त्यांनी आश्वासन दिले होते. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर गुन्हा दाखल 

तथापि, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नाशिक येथे संपर्क साधून तक्रार दिली. लाच मागितल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये २८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संदीप घुगे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका; ठाकरे बंधूंना धक्का, बड्या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं

SCROLL FOR NEXT