Dhule Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Dhule News : मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या सेंधवा येथून शिरपूरकडे रुग्णवाहिकेतून काही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या हेतूने अमानुषपणे कोंबून नेली जात होती

भूषण अहिरे

धुळे : कोणाला संशय येऊ नये या उद्देशाने रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी केली जात होती. (Shirpur) शिरपूर तालुका पोलिसांनी ॲम्बुलन्समधून गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करत (Dhule) तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या सेंधवा येथून शिरपूरकडे रुग्णवाहिकेतून काही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या हेतूने अमानुषपणे कोंबून नेली जात होती. याबाबतची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून शिरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी (Shirpur Police) सापळा रचला असता हाडाखेड चेक पोस्ट या ठिकाणी रुग्णवाहिकेची तपासणी केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहा जनावरे कोंबलेली 

पोलिसांनी तपासणी केली असता रुग्णवाहिकेत जवळपास दहा गोवंश जातीची जनावरे अमानुषपणे बांधून व कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले. या संदर्भात दोन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, या कारवाईदरम्यान दहा गोवंश जातीच्या जनावरांची मुक्तता करत पोलिसांनी या गाईंना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे तपासणी करून गोशाळेत त्यांची रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Fall Remedies: हिवाळ्यात केस गळणे कमी करण्यासाठी सोपे उपाय काय करावे?

Dahi Puri Recipe: चौपाटी स्टाईल चटपटीत दहीपुरी कशी बनवायची?

Hardik Pandya: गर्लफ्रेंडचे नको तसे फोटो काढले; फोटो व्हारल होताचं हार्दिक पंड्या संतापला

Nagpur News: आंदोलन करणाऱ्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान धक्कादायक घटना|Video Viral

Wednesday Horoscope: या ५ राशींना अचानक होणार धनलाभ, कामातले अडथळे वाढणार; वाचा बुधवारचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT