शिरपूर (धुळे) : मेसच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर युवती व युवक दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. साधारण दीड महिना सोबत राहिल्यानंतर तरुणाच्या व्यसनाधीनतेमुळे युवतीने युवका सोबत असलेले नातं तोडले. याचा राग आल्याने युवकाने सदर युवतीचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.
धुळ्याच्या शिरपूर येथील हा प्रकार असून व्यंकटेश दीपक बारी असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान ग्रामीण भागातील असलेली युवती हि शिरपूरमध्ये एका संस्थेत कार्यरत आहे. तर संशयित युवकाचा खानावळीचा व्यवसाय आहे. युवतीने तरुणाकडे मेसचा डबा लावला होता. त्याच्याकडून डबा घेण्यास सुरुवात केल्यानंतर काही दिवसांच्या ओळखीनंतर युवकाने तिला प्रेमाचा प्रस्ताव दिला. तिनेही होकार दिल्यानंतर दोघे शहरातील एका खोलीत लिव्ह-इनमध्ये राहू लागले.
दारूच्या व्यसनामुळे तोडले नाते
मात्र सदर युवकाला मद्याचे व्यसन असल्याचे युवतीच्या लक्षात आले. यानंतर तिने त्याला व्यसन सोडण्याचे सांगितले. मात्र, युवकाने न एकटा दररोज मद्यप्राशन करून येत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले. यानंतर दीड महिने सोबत राहिल्यानंतर युवतीने व्यंकटेश याच्यासोबत असलेले नाते तोडले. यानंतर ती गावी परत गेली. या दरम्यान व्यंकटेशने युवतीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.
व्हिडीओ केले व्हायरल
यातच संशयिताने तुझे आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप आहेत, ते व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. याचा राग आल्याने संशयिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आक्षेपार्ह क्लिप व्हायरल केल्या. त्यानंतर १७ सप्टेंबरला संशयिताने युवतीची भेट घेत तिचा मोबाईल हिसकावून त्यावरून तिच्या संस्थेच्या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ पाठवले. घडलेल्या प्रकारामुळे त्रासलेल्या युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून संशयितांचा शोध सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.