Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : मोबाईल पाहताना चुकून फाइलवर झाले क्लीक; पुढे जे घडले ते भयंकर, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

Dhule Shirpur News : बंटी मित्रांसोबत बसला होता. यावेळी तो व्हॉट्‌सअ‍ॅपवरील संदेश पाहत असताना त्याच्याकडून एपीके फाइलवर अनावधानाने क्लीक करण्यात आले. यामुळे काही वेळातच फाइल डाउनलोड झाली

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : सायबर गुन्हेगारांकडून गंडविण्याच्या इराद्याने वेगवेगळ्या लिंक किंवा फाईल मोबाईलवर पाठविल्या जातात. अशाच प्रकारे पाठविण्यात आलेल्या फाईलवर मोबाईल पाहत असताना फाईलवर क्लिक झाले आणि फाइल डाउनलोड झाली. हीच संधी साधत सायबर गुन्हेगारांनी मोबाईल हॅक केला. यानंतर घडलेल्या प्रकाराने तरुण हादरला. काही वेळातच या तरुणाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सदरची घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातील ताजपूरी या गावातील किशन उर्फ बंटी जितेंद्र सनेर (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. घरात एकुलता मुलगा असून तो फार्मसी पदविका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता. दरम्यान ५ जुलैला त्याने घराच्या वरच्या मजल्यावर छताला साडीने गळफास घेतला. त्याचे आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करतात. ते शेतातून परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

फाईल डाऊनलोड होताच मोबाईल हॅक  
दरम्यान ५ जुलैला दुपारी बंटी हा मित्रांसोबत बसला होता. यावेळी तो व्हॉट्‌सअ‍ॅपवरील संदेश पाहत असताना त्याच्याकडून एपीके फाइलवर अनावधानाने क्लीक करण्यात आले. यामुळे काही वेळातच फाइल डाउनलोड झाली. या नंतर सायबर गुन्हेगाराने मोबाईल हॅक करत व्हॉट्‌सअ‍ॅपसह गॅलरीतील डाटाचे संपूर्ण नियंत्रण मिळविले. लागलीच त्यांनी मोबाईलमधील सर्व ग्रुप व खासगी अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो प्रसारित केले. 

बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल  

मोबाईल हॅक झाल्याने सायबर गुन्हेगारांनी बंटीच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड केले. हे सर्व चित्र पाहून आपली बदनामी होईल; या भीतीतून बंटीला मोठा धक्का बसला. यातून त्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT