Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Dhule News : धुळे शहर व जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास देखील पाऊस सुरूच होता. यामुळे जुने असलेल्या घराचे छत पावसामुळे अचानकपणे कोसळले

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरासह परिसरात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे रात्रीच्या सुमारास एका घराचे छत अचानक कोसळल्याची घटना शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात घडली आहे. या घटने छताच्या खाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले पती आणि नातू हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. 

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली असून या घटनेत सुपाबाई तात्या चव्हाण (वय ६३) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. दरम्यान धुळे शहर व जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास देखील पाऊस सुरूच होता. यामुळे जुने असलेल्या घराचे छत पावसामुळे अचानकपणे कोसळले. यावेळी घरात परिवार झोपलेला होता. 

रात्रीच्या सुमारास घरात वृद्ध पती- पत्नी आणि त्यांचा नातू झोपलेले होते. तिघेजण गाढ झोपेत असताना संततधार पावसामुळे घराचे छत अंगावर पडल्यामुळे आजी- आजोबा आणि नातू असे तिघेजण छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात वृद्ध महिलेचा छताखाली दाबून जागीच मृत्यू झाला. तर आजोबा व नातू हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

आवाज ऐकून ग्रामस्थ धावले 

जवळपास रात्री दीड वाजेच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. गाव झोपलेले असताना अचानकपणे रात्री मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बचावकार्य करत आजीचा मृतदेह ढीगाऱ्या खालून काढला. तर वृद्ध इसम व चिमुकल्याला ढीगाऱ्याखालून काढत त्यांचा जीव वाचविला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका अविश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT