Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : पाणी पिण्यासाठी झाडाखाली बसताच घडले दुर्दैवी; वीज अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Dhule News : शेती काम सुरू असतानाच त्यांनी औत थांबवत बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले. यावेळी हंड्यातील पाणी पिण्यासाठी बसले होते. तेव्हाच अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला

भूषण अहिरे

धुळे : मान्सूनची अद्याप प्रतीक्षा आहे. यामुळे शेतकरी शेती मशागतीचे कामे पूर्ण करून पेरणीच्या अनुषंगाने तयारी करत आहेत. अशाच प्रकारे शेतात मशागतीचे काम करत असताना दुपारच्या सुमारास अचानक ढग जमा झाले आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. यातच जोरदार आवाज होऊन वीज कोसळली. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात सदरची घटना घडली आहे. नथ्थू हार्दिक सनेर (वय ६०) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आढे शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करत होते. खरीप हंगामासाठी शेतात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान दुपारनंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे अनेक भागात पेरणीच्या कामांना सुरवात देखील झाली आहे. 

पाणी पिण्यासाठी बसताच वीज कोसळली 

दरम्यान शेती काम सुरू असतानाच त्यांनी औत थांबवत बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले. यावेळी हंड्यातील पाणी पिण्यासाठी बसले होते. तेव्हाच अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्या दरम्यान जोरदार आवाज होऊन वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत नथ्थू सनेर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

परिसरात जोरदार पाऊस 

दरम्यान शनिवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वादळी वारा व विजांचा कडकडाट देखील सुरु झाला होता. काही वेळातच शिरपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीच्या तयारीला वेग आला आहे. मात्र पेरणी योग्य असा मॉन्सूनचा पाऊस अद्याप आला नसल्याने पेरणीचे काम खोळंबले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT