Crime News : एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास; भुम शहरात पहाटेची घटना

Dharashiv News : एटीएम मशीनवर चोरट्यानी आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने याचा फायदा चोरटे सहज घेत आहेत. ग कटरच्या सहाय्याने काही क्षणात मशीन कापून रक्कम लांबविली जात आहे
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : एटीएम मशीन फोडून रक्कम लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम वर सुरक्षा रक्षक राहत नसल्याने चोरटे सुनसान परिसर असल्याची संधी साधून एटीएम फोडून रक्कम लांबवत आहेत. अशीच घटना धाराशिवच्या भूम शहरात पहाटेच्या सुमारास घडली आहे. यात एसबीआयच्या एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

एटीएम मशीनवर चोरट्यानी आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने याचा फायदा चोरटे सहज घेत आहेत. ग कटरच्या सहाय्याने काही क्षणात मशीन कापून रक्कम लांबविली जात आहे. अशाच प्रकारे धाराशिवच्या भूम शहरातील पार्डी रोडवर हि घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. पार्डी रोडवरील खुशी कॉम्प्लेक्स येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान फोडले. एटीएम मधील लाखो रुपये चोरट्याने लंपास केले आहेत. 

Crime News
Latur : सावधान! लातूरमध्ये घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह; मानवालाही होऊ शकते संक्रमण, ३० घोड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी रवाना

नागरिकांच्या लक्षात आली घटना 

दरम्यान सकाळी परिसरातील नागरिकांच्या एटीएम तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. सदरील एटीएम हे खाजगी कंपनीकडे देखरेखसाठी असल्याने या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नव्हता. मात्र एटीएम मधील लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज आहे.

Crime News
Nandurbar Mahayuti : नंदुरबारमध्ये महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

चोरटे सीसीटीव्हीत कैद 

दरम्यान चोरी गेलेल्या रक्कम किती? याबाबतचा आकडा स्पष्ट झालेला नाही. मात्र एटीएममध्ये किती रक्कम चोरीला गेली कंपनीचे अधिकारी भूम येथे आल्यानंतरच स्पष्ट होईल. तर येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दरम्यान अशा चोरीच्या घटना वारंवार भूम शहरासह भूम तालुक्यामध्ये घडत आहेत. तरी नागरिकांकडून प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com