Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: मासेमारीच्‍या जाळ्यात अडकून बुडाला; पोहायला गेलेल्‍या एनडीए प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा मृत्‍यू

मासेमारीच्‍या जाळ्यात अडकून बुडाला; पोहायला गेलेल्‍या एनडीए प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा (NDA) पाण्यात बुडाल्याने (Shirpur) मृत्यू झाला. ही घटना १५ जूनला सायंकाळी हाडाखेड (ता.शिरपूर) येथे घडली. (Maharashtra News)

हिमांशू शरद चौधरी (वय २१, रा.जापोरा ता.शिरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो पुणे येथील एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत होता. करवंद धरणाच्या हाडाखेड येथील जलक्षेत्रात तो मित्रांसह पोहायला गेला होता. तेथे पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला. उत्तम जलतरणपटू असल्याने तो खोल पाण्यात शिरला. मात्र मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात तो अडकला. धडपड करूनही पाण्याबाहेर येण्यात अपयश आल्याने तो बुडाला.

सुटीत आला होता घरी

त्याच्या मित्रांनी आकांत केल्यानंतर परिसरातील लोक जमले. त्यांनी हिमांशूचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दहिवद (ता.शिरपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर राजपूत व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. जापोरा येथे शुक्रवारी (१६ जून) हिमांशूच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षभरापूर्वी त्याची एनडीएसाठी निवड झाली होती. सुटीत तो घरी आला होता. या घटनेमुळे जापोरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT