Shirpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा कान कापून घेतला दागिना

Dhule News : फिर्यादीवरून पती घनश्याम राठोड याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीच्या कानातील दागिना काढून घेण्यासाठी (dhule) नवऱ्याने तिचा कानच कापून काढला. ही घटना भाटपुरा (ता. शिरपूर) येथे घडली. जखमी महिलेवर उपचार सुरू असून, पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पतीविरोधात थाळनेर (Police) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

जागृती घनश्याम राठोड (वय ३०, रा. भाटपुरा) असे (Shirpur) जखमी महिलेचे नाव आहे. पती घनश्याम काळू राठोड (वय ३५) हा घरी आला असता पतीकडे ‘मला दारू पिण्यासाठी पैसे दे’ अशी त्याने मागणी केली. मात्र पत्नीने माझ्याकडे पैसे नाहीत, कुठून देऊ; असे उत्तर दिले. यानंतर पत्नीला कानातील दागिना (Crime News) काढून देण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुळे घनश्याम राठोडने हातात चाकू घेऊन तिचा डावा कान कापून काढला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी पत्नी रुग्णालयात 

कानातून रक्तस्राव झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी जागृतीला रुग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती घनश्याम राठोड याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT