Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; ७ भाविक जखमी

Dhule News : चैत्र नवरात्री निमित्ताने कुलस्वामिनी पेडकाई देवी मातेचा यात्रोत्सव भरला आहे. यानिमित्ताने लाखो भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात.

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : चैत्र नवरात्री असल्याने भाविक कुलस्वामिनीच्या दर्शनाला जात मानलेला नवस फेडत असतात. (Dhule) असा नवमीच्या दिवशी कुलस्वामिनी पेडकाईदेवी मातेला मानलेला नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला (Accident) अपघात झाला. या अपघातात ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

चैत्र नवरात्री निमित्ताने कुलस्वामिनी पेडकाई देवी मातेचा यात्रोत्सव भरला आहे. यानिमित्ताने लाखो भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. या प्रमाणे धुळे तालुक्यातील वार- कुंडाणे येथील काही भाविक मालवाहतूक वाहनाने नवस फेडण्यासाठी आले होते. दरम्यान दुपारी नवस फेडल्यानंतर सर्व भाविक परतीच्या प्रवासाला निघाले. चिमठाणे पासून (Songir) सोनगीरकडे दोन किलोमीटरवर अंतरावर राज्य परिवहन महामंडळाची नाशिक-शहादा बसने वाहनाला धडक दिली. यात गाडीत बसलेले भाविक जखमी झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकहून (Shahada) शहाद्याकडे जाणाऱ्या एसटी बसने चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ दिलेल्या धडक दिल्याने वाहनातील तीन महिला व चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सोनगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात व धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्ग एकवर हा अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT