सुशील थोरात
अहमदनगर : जंगलातून शिकार व पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने अहमदनगर शहर व परिसरात धुमाकूळ (Ahmednagar) घातला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. (Tajya Batmya)
गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीची आणि दहशतीचे वातावरण या बिबट्याने (Leopard) केले होते. या बिबट्याने अनेकांवर हल्ले केल्याच्या घटना मागील काही दिवसात झाल्याच्या पाहण्यास मिळाल्या. याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला असून यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. बिबट्या (Forest Department) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरल्यानंतर बघ्यांनी मात्र या ठिकाणी तुफान गर्दी केली होती
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मादी बिबट्याचा वावर
दरम्यान हा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी आणखीन एक मादी व तिचे पिल्ले या भागात आजही निदर्शनास येत असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.