Akola Crime News : दुहेरी हत्याकांडाने अकोला हादरले; मध्यरात्री वेगवेगळ्या खुनाच्या घटनामध्ये दोघांचा मृत्यू

Akola News : मध्यरात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. शहरात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनामध्ये दोघांचा मृत्यु झाला आहे.
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv

अक्षय गवळी 
अकोला
: मध्यरात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. शहरात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनामध्ये दोघांचा मृत्यु झाला आहे. (Akola) भर रस्त्यात धारदार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आल्या आहेत. यात अतुल रामदास थोरात (वय ४०) आणि राज संजय गायकवाड (वय १९) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहे. या घटनांमुळे शहरात खडबळ उडाली आहे. या घटने संदर्भात रामदास पेठ (Police) पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Live Marathi News)

Akola Crime News
Railway Police : रेल्वे पोलिसांच्या मदतीला तिसऱ्या डोळ्यासह कानही; काय आहे गुन्हेगारी रोखण्यासाठीचा आईज अँड इअर्स उपक्रम

अकोला शहरात घडलेल्या एका घटनेत अतुल थोरात रेल्वे स्टेशनजवळील गुजराती उपहार गृहासमोरुन दुचाकीवरून येत असताना तीन अज्ञात मारेकऱ्यांनी त्याला थांबवून घेरले. त्यांच्यात वाद होऊन यात हाणामारी सुरू झाली. (Crime News) अतुलने प्रतिकार केला. परंतु थोड्याच काळात आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करीत त्याच्यावर वार केले. जखमी अतुलची आजूबाजूच्या नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकऱ्यांनी (Akola Crime News) नागरिकांनाही धमकावले. अतुलची हत्या करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान रामदास पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठलं. अद्यापपर्यंत अतुल यांच्या हत्येचं मूळ कारण समजलं नसून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान अतुल थोरात यांच्या हत्येच्या ठिकाणचे पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ जप्त केले असून त्या आधारावर आरोपींचा शोध सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Crime News
Navi Mumbai : पार्किंगवरून वाद; बिल्डरच्या महिला बाउंसरकडून रहिवाशांना धक्काबुक्की

अतुलच्या हत्येचा घटनास्थळी पंचनामा सुरू असतानाच याच पोलिस स्टेशन हद्दीतील भवानी पेठेत दुसरी हत्येची माहिती समजली. यात देशमुख फाईलजवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड (वय १८) याचीही तीन अज्ञात आरोपींनीच हत्या केल्याचे समजते. दरम्यान काल अकोल्यात श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते. या दरम्यान राजूचा काही युवकांशी वाद झाला होता. हा वाद मित्रांच्या मदतीने इथंचं शांत झाला. परंतु रात्री २ वाजताच्या सुमारास राजूच्या घरी काही तरुण आले. त्यांनी धारदार शस्त्रांनी राजूच्या अंगवार वार केले. राजूचे नातेवाईक आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तोपर्यंत त्याचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यु झाला होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com