Railway Police : रेल्वे पोलिसांच्या मदतीला तिसऱ्या डोळ्यासह कानही; काय आहे गुन्हेगारी रोखण्यासाठीचा आईज अँड इअर्स उपक्रम

Kalyan News : रेल्वे स्थानक व लोकल ट्रेनमध्ये चोरी, हल्ले, लुटपाट असे गुन्ह्यांचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी विविध पथके तयार केली
Railway Police
Railway PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: रेल्वे प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रेल्वे पोलीस तसेच सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील याला आला बसत नाही. यामुळे (Railway Police) रेल्वे पोलिसांनी आता आईज अँड ईअर्स उपक्रम सुरु केला आहे. (Kalyan) या उपक्रमात स्टेशन परिसरातील स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी, हमाल, सफाई कर्मचारी, रिक्षा चालक यांना सहभागी करण्यात आलंय. हे सर्व आता पोलिसांचे डोळे व कान बनून काम करत आहेत. (Breaking Marathi News)

Railway Police
Lightning Strike : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी; जामखेड तालुक्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

रेल्वे स्थानक व लोकल ट्रेनमध्ये चोरी, हल्ले, लुटपाट असे गुन्ह्यांचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी विविध पथके तयार केली. त्याचप्रमाणे आईज अँड इअर्स म्हणजेच डोळा आणि कान उपक्रम सुरु केला. यात (Railway Station) रेल्वे स्टेशन परिसरातील पोलीस मित्र, स्टॉल्स धारक स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी, हमाल, सफाई कामगार, रिक्षाचालक, बूट पॉलिश करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यांच्यामार्फत स्टेशन परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकारांची, गुन्ह्यातील आरोपींची माहिती पोलिसांना मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Railway Police
Jalgaon Temperature : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांवर

४-५ तासातच आरोपी ताब्यात 

स्टेशन परिसरात दिवस- रात्र वावरणारे हे घटक पोलिसांचे डोळे आणि कान बनल्याने गुन्ह्यांना आळा बसला आहे. तर घडलेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना तत्काळ पकडण्यात पोलिसांना यश मिळते. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली चोरीची घटना व तीन दिवसांपूर्वी झालेला मुख्याध्यापकावर हल्ला या दोन्ही प्रकरणातील आरोपी या उपक्रमामुळे चार- पाच तासातच पकडण्यात यश आल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. हा उपक्रम आणखी यशस्वीपणे राबवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उंदरे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com