Kalyan : लष्कर एक्सप्रेसमध्ये थुंकण्यावरून वाद, दाेघांना गंभीर मारहाण; चार युवकांना अटक

Kalyan Crime News : मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला.
kalyan grp police arrests two youth in agra mumbai express
kalyan grp police arrests two youth in agra mumbai express saam tv

- अभिजित देशमुख

Kalyan GRP Police :

आग्रा मुंबई लष्कर एक्सप्रेस मध्ये प्रवासादरम्यान थुंकण्यास विरोध केल्याने दोन प्रवाशांना तरुणांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली. या घटनेतील मारहाण करणाऱ्या युवकांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेंतले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनमाड रेल्वे पोलिस ठाण्याकडे अटकेतील आरोपींना ताब्यात दिले. (Maharashtra News)

आग्रा मुंबई लष्कर एक्सप्रेस मधून मुंबईच्या दिशेने प्रशांत सिंग आणि जगविर उर्फ गणेश सिंग हे दोघे काल प्रवास करत होते. मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानका दरम्यान काही तरुण एक्स्प्रेस मध्ये थुंकत होते. प्रशांत आणि गणेशने या तरुणांना येथे थंकू नका असे सांगत थुंकण्यास विरोध केला.

kalyan grp police arrests two youth in agra mumbai express
Nashik: लासलगावसह नाशकातील बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प; हमाली, तोलाई, भराई कपातीचा निर्णय लांबला

त्यामुळे संतापलेल्या या तरुणांनी प्रशांत आणि जगवीर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणात सहा तरुणांनी प्रशांत आणि जगवीर यांना बेदम मारहाण केली. याच डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी लष्कर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येताच मारहाण करणाऱ्या चार तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. प्रमोद माळी, अजय पवार, गणेश कापसे, अजय कापसे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करत अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Edited By : Siddharth Latkar

kalyan grp police arrests two youth in agra mumbai express
Kalyan Crime News : महाराष्ट्रासह तेलंगणात घरफोडी दोघे गजाआड, कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com