Navi Mumbai : पार्किंगवरून वाद; बिल्डरच्या महिला बाउंसरकडून रहिवाशांना धक्काबुक्की

Navi Mumbai : व्यवसायिकाने सदनिका धारकांच्या पार्किंगमध्ये लोखंडी दोरखंड लावून सदनिका धारकांना जाण्यास मज्जाव केला
Navi Mumbai
Navi MumbaiSaam tv

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: पार्किंगवरून रहिवाशांनामध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघरमध्ये समोर आली असून येथील शिवशंकर टॉवर इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून बांधकाम व्यावसायिकाच्या ७ ते ८ महिला बाउंसरनी मिळून रहिवाश्यांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Navi Mumbai
Jalgaon Temperature : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांवर

नवी मुंबईच्या खारघर (Kharghar) परिसरात असलेल्या शिवशंकर टॉवर या इमारतीमध्ये बांधकाम व्यवसायिकाने सदनिका धारकांच्या पार्किंगमध्ये लोखंडी दोरखंड लावून सदनिका धारकांना जाण्यास मज्जाव केला. यामुळे वादाला सुरुवात झाली. बांधकाम व्यवसायिकाने महिला बाउंसर बोलावून सदनिका धारकांना पार्किंगमध्ये जाण्यास मज्जाव केला असता वाद वाढला आणि महिला बाउंसरने मिळून रहिवाशीयांना धक्काबुक्की करत राडा घातला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navi Mumbai
Railway Police : रेल्वे पोलिसांच्या मदतीला तिसऱ्या डोळ्यासह कानही; काय आहे गुन्हेगारी रोखण्यासाठीचा आईज अँड इअर्स उपक्रम

रहिवाशांची पोलिसात धाव 

सदर प्रकार घडल्यानंतर रहिवाश्यानी पोलिसात (Police) धाव घेतली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिक आणि महिला बाउंसरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com