Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, धुळे जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Dhule News : शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजना अर्थात शालेय पोषण आहार दिला जात असतो. यात आता धान्य देण्याऐवजी शाळेतच अन्न शिजवून दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांना दिले जाते

भूषण अहिरे

धुळे : शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत घडला असून या प्रकारामुळे शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.  

शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजना अर्थात शालेय पोषण आहार (Poshan Aahar) दिला जात असतो. यात आता धान्य देण्याऐवजी शाळेतच अन्न शिजवून दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांना दिले जाते. प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेत हि योजना प्रकर्षाने राबविली जात आहे. यामुळे गरीब घरातील मुलांना शाळेतच जेवण मिळत असते. यासोबत आता चॉकलेट देखील दिले जात आहेत. मात्र या चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार (Sakri) साक्री तालुक्यातील भोनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडला आहे. 

एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नाही 

जिल्हा परिषद शाळेत (Zp School) विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये जिवंत आळ्या आढळल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील भोनगांव जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चॉकलेटवर छापण्यात आलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नाही. अर्थात मुदतीत असलेल्या या चॉकलेटमध्ये आल्या आढळून आल्याने पुरवठा करण्यात आलेल्या मालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT