बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील ए टू झेड इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी चालविणाऱ्या शिक्षकाने एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना समोर आल्यानंतर खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्लिश स्पिकिंग शिकण्यासाठी मुलीने खासगी क्लास लावला होता. या क्लासमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकाने सदर मुलीला तुला काहीही प्रॉब्लेम आल्यास मी आहे, काळजी करू नको..! असं म्हणत लैंगिक अत्याचार केला. गेल्या अनेक दिवसापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने ही बाब आपल्या मैत्रिणींना सांगितली. (Crime News) यानंतर मैत्रिणींनी पीडित मुलीच्या पालकांना सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
संशयितास घेतले ताब्यात
पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक किशोर पाटील यांच्या विरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे बदलापूर घटनेनंतर सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास बंधनकारक केलं होतं , मात्र या इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी व परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.