Tractor Trolley Falls Into Well Two Girls Missing Saam
महाराष्ट्र

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

Tractor Trolley Falls Into Well Two Girls Missing: धुळ्यातील साक्री गणेशपूर येथील कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ६० फूट खोल विहिरीत कोसळली. तीन मुलंही विहिरीत पडल्या.

Bhagyashree Kamble

धुळ्यातील साक्री येथील गणेशपूर परिसरात अपघाताची घटना घडली आहे. कांदे भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काही लहान चिमुकले खेळत होते. दरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे तीन चिमुकलेही विहिरीत पडले. एका २ वर्षीय चिमुकलीचा शोध लागला असून, इतर दोन लहान मुलांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी दाजू ठाकरे (वय वर्ष ३) आणि ऋतिरा संदीप गायकवाड (वय वर्ष ३) असे विहिरीतल्या पाण्यात बेपत्ता असलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर, परी संदीप गायकवाड या २ वर्षीय चिमुकलीचा शोध लागला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गणेशपूर परिसरात कांदा चाळीतील कांदे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते. मजुरांचे काम सुरू असताना, काही चिमुकले ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये खेळत होते. दरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉली अचानक सुरू झाली. ट्रॅक्टर ट्रोली थेट विना कठड्याच्या विहिरीत कोसळली. ही विहीर ६० फूट खोल असून, पाण्याने तुडूंब भरलेली होती.

ही घटना इतकी अचानक घडली की कुणालाही काही समजण्याच्या आत ट्रॅक्टर आणि त्यावरील मुली पाण्यात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून एका मुलीला सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने या घटनेत दोन मुली अद्यापही बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन दाखल झाले असून, ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या मुलींचा शोध घेतला जात आहे. या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे गणेशपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT