dhule news police trainee death saam tv
महाराष्ट्र

Dhule : धुळ्यात खळबळ, ट्रेनिंगदरम्यान पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

Dhule News : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पनिशमेंट ट्रेनिंगदरम्यान जवानाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Yash Shirke

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धुळ्यात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा प्रशिक्षण केंद्रात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षण सुरु असताना अचानक या जवानाच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला पनिशमेंट ट्रेनिंग दिल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यशवंत घायवट (वय ४३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थीचे नाव आहे. पंकज घायवट हा एक्स मॅन होता अशी माहिती समोर आली आहे. पनिशमेंट ट्रेनिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यामुळे पंकज सोबत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी जवानांनी एकच आक्रोश केला आहे.

सोबतच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांतर्फे मज्जाव करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे झाला आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या जवानाला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. पनिशमेंट ट्रेनिंगमुळे या जवानाचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT